712 हमीभावात तूर खरेदी करण्याचे केंद्राचे राज्य सरकारला आदेश
Continues below advertisement
तूर बाजारात येऊनही राज्य सरकारनं खरेदी केंद्र सुरु केली नव्हती. त्यामुळे नाईलाजानं शेतकऱ्यांना कमी दरात व्यापाऱ्यांना तूर विकावी लागत होती. मात्र ही खऱेदी केंद्र लवकरात लवकर सुरु करण्याचे आदेश केंद्र सरकारनं राज्य सरकरला दिलेत. यामध्ये साडे ४ लाख टन तुरीची खरेदी करण्य़ाचे निर्देश देण्यात आलेत. या आधी तुरीचा हमीभाव ५ हजार ४५० असतानाही ३ हजार ८०० च्या दरानं शेतकरी तूरीची विक्री करत होते. मात्र आता हमीभावानं तुरीची खरेदी करण्याचे आदेश केंद्रानं राज्य सरकारला दिलेत. खरेदी संस्थांशी करार झाल्यानंतर ही खऱेदी सुरु करणार असल्याचं सांगीतलं गेलंय. यंदा राज्यात तुरीचं उत्पादन ३९ लाख ९ हजार टन इतकं होण्याचा अंदाज आहे.
Continues below advertisement