712 शेती जगत : यंदा राज्यात 80 लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज
यंदाच्या साखर उत्पादनाचा अंदाज नुकताच जाहीर करण्यात आला. यात आतापर्यंतचं देशातील साखऱ उत्पादन २६१ लाख टन झाल्याचं सांगण्यात आलंय. गेल्या वर्षी याच काळात हे उत्पादन जवळपास २४६ लाख टन इतकं होतं. राज्यातील साखर उत्पादन सध्या ७३लाख टन इतकं झाल्याचं सांगण्यात येतंय. हे उत्पादन ८० लाख टनांपर्यंत होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय.या आकड्यांवरुन राज्यातील ऊस उत्पादनात वाढ झाल्याचं दिसून येतंय.