712 भारतीय साखरेची म्यानमारमध्ये निर्यात

Continues below advertisement
देशातील साखरेच्या दराचा मुद्दा गंभीर झालाय. अपेक्षेपेक्षा जास्त उत्पादन झाल्यानं साखऱेच्या निर्यातीचे प्रयत्न सरकार करतंय. म्यानमारमध्ये आता देशातील साखरेची निर्यात करण्यात येणारेय. २०१६ नंतर आता दोन वर्षांनी भारत म्यानमारमध्ये साखऱ निर्यात करणारेय. म्यानमारमध्ये ८ ते १० हजार टन साखरेची निर्यात होण्याची शक्यता तज्ञ वर्तवतायत. या निर्यातीला भारत सरकारचे धोरण पुरक ठरले, तर जवळपास ३ लाख टन साखऱेची निर्यात होण्याची अपेक्षा असल्याचंही म्हटलं जातंय.यंदाच्या गाळप हंगामात देशात ३ कोटी २० लाख टन साखऱ उत्पादन झालंय. येत्या हंगामावरील ताण कमी करण्यासाठी साखऱेची लवकरात लवकर निर्यात करणं गरजेचं आहे.त्यातच म्यानमारची ही संधी फायद्याची ठरु शकते.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram