स्पेशल रिपोर्ट 712 जळगाव: भरारी संस्थेचं लाखमोलाचं कार्य, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च
Continues below advertisement
सतत २ ते ३ वर्ष दुष्काळ सोसलेल्या भागांमध्ये शेतकरी आत्महत्या झाल्या. त्यांची संख्या हजारोंच्या घरात गेली. घरातला कमावता हात गेल्यानं शेतकरी कुटुंबाला हाल सोसावे लागले. अशा कुटुंबांच्या मदतीसाठी राज्यभरात संस्था समोर आल्या. आजही जळगाव आणि वर्ध्यातील या संस्था अशा कुटुंबांना मदतीचा हात देतात.
Continues below advertisement