712 : देशभरात मान्सूनच्या खंडाने कापूस, सोयाबीन पेरणीला उशीर

Continues below advertisement
पावसाच्या दडी सोबतच किड आणि रोगांच्या समस्येमुळेही काही पिकांच्या पेरणी क्षेत्रात घट झाली आहे. राज्यात गेल्या वर्षी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बोंडअळीच्या संकटाला सामोरं जावं लागलं. त्याचीच धास्ती घेऊन यंदा मोठ्या प्रमाणात कापूस उत्पादक शेतकरी सोयाबीनकडे वळले आहेत. याचंच उदाहरण मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये बघता येईल. औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद, परभणी सारख्या जिल्ह्यांमध्ये कापसाखालील क्षेत्र कमी होऊन सोयाबीनचं क्षेत्र वाढताना दिसत आहे. तिथेच इतर राज्यांमध्ये मान्सूनच्या खंडामुळे सोयाबीन आणि कापासच्या पेरण्यांना उशीर झाला आहे. पेरण्यांना उशीर झालेल्या राज्यांमध्ये गुजरातसह महाराष्ट्राचाही समावेश आहे. यात कापसाच्या पेरणीमध्ये १६ टक्क्यांची घट नोंदवण्यात आली आहे. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram