712 | पालघर | शेतीतील नवदुर्गा | लतिका पाटील यांची यशोगाथा
आजची आपली नवदुर्गा आहे समुद्र किनारा लाभलेल्या पालघर जिल्ह्यातील. कित्येक वर्ष सरस्वतीची सेवा केल्यानंतर, त्या काळ्या आईकडे आल्या. परंपरेमध्ये अडकून न जाता त्यांनी आधुनिकतेची कास धरली आणि आपल्यासोबतच इतर महिलांचं अर्थकारण बदललं. ही कथा आहे बोर्डीच्या लतिका पाटील यांची. चिकूच्या प्रक्रिया उद्योगातून त्यांनी बाजारात स्वतःचा ब्रँड तयार केलाय.