712 : साखरेच्या प्रश्नावर शरद पवारांची नितीन गडकरींशी चर्चा, तोडगा काढण्याचं गडकरींचं आश्वासन
Continues below advertisement
यंदा देशातील साखर उत्पादनात कमालीची वाढ झालीये. तब्बल ३१५ लाख टन साखऱ उत्पादन होण्याचा अंदाज आहे. साखरेच्या दराचा प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र सरकारनं अवजड रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली एक समिती गठीत केली. नुकतीच या संदर्भात चर्चा करण्यासाठी माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी शिष्टमंडळासोबत नितीन गडकरींची भेट घेतली. बैठकीमध्ये मांडलेल्या मुद्द्यांवर विचार करुन लवकरात लवकर तोडगा काढण्याचं आश्वासनही नितीन गडकरी यांनी दिलं.
Continues below advertisement