712 : शेती जगत : रब्बी हंगामातील उत्पादनाचा अंदाज
Continues below advertisement
रब्बी हंगामातील उत्पादनाचा अंदाज नुकताच कृषी विभागानं जाहीर केला. चांगल्या मान्सूनमुळे राज्यात खरीपात पेरणी चांगली झाली. रब्बी हंगामातही पिकांचा पेरा वाढला असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यानुसार यंदाचं अन्नधान्य उत्पादनही विक्रमी असणार असं म्हटलं जात आहे. मात्र, यात गहू आणि तेलबियांच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. यंदा देशातील अन्नधान्य उत्पादनात गेल्या वर्षीपेक्षा 0.9 टक्क्यांनी वाढ होणार असल्याचा अंदाज आहे. यात सर्वाधिक उत्पादन तांदळाचं होणार आहे. यंदा तांदळाचं उत्पादन 11 कोटी 10 लाख टन होण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement