712 : कोंबड्यांसाठीचे रोगप्रतिकारक औषधं शाकाहारींसाठीही धोकादायक
Continues below advertisement
कुक्कुटपालनामध्ये कोंबड्यांना रोगांपासून वाचवण्यासाठी रोग प्रतिकारक औषधं दिली जातात. मात्र या औषधांचा ओव्हर डोस मांसाहारी सोबतच शाकाहारींनाही धोक्याचा ठरु शकतो. द गार्डीयन या ब्रिटन मधील वृत्तपत्रात याबाबतची माहिती देण्यात आली. कोंबड्यांच्या विष्ठेचा वापर शेतांमध्ये नैसर्गीक खत म्हणून केला जातो. रोग प्रतिकारक औषधांचा अंश त्या विष्ठेवाटे पिकांमध्ये जातो. अशा प्रकारे या औषधांचा विपरित परिणाम शाकाहारींवरही होऊ शकतो. भारतात या रोग प्रतिकारक औषधांचा वापर सर्वाधिक प्रमाणात केला जातो. निर्बंध घातलेल्या औषधांचीही बाजारात सर्रास विक्री केली जाते.
Continues below advertisement