व्हॉट्सअॅपद्वारे झेंडूंच्या फुलांची विक्री | 712 | परभणी | एबीपी माझा
बऱ्याचदा शेतकरी उत्पादन तर चांगलं घेतो, पण त्याच्या विक्रीचं नियोजन न झाल्यानं उत्पन्न म्हणावं तसं मिळत नाही. परभणीतील झेंडु उत्पादक शेतकऱ्यांच्या याच समस्येवर सोशल मिडियाचा तोडगा काढण्यात आला. जिल्ह्यातील शिक्षक आणि साहित्यिकांनी एकत्र येत या शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळवून दिलाय.