712 | परभणी | लष्करी अळी भारतात, मक्यासह आणखी 100 पिकांचं नुकसान
आफ्रिका आणि अमेरीकेत थैमान घातलेली लष्करी अळी भारतात आढळलीये. संपूर्ण आशियातील हा पहिलाच प्रादुर्भाव असल्याचं म्हटलं जातंय. कर्नाटकात मका पिकावर या किडीचा ७० टक्के प्रादुर्भाव आढळलाय. महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात मक्याची लागवड होत असल्यानं, या किडीच्या प्रादुर्भावाची दाट शक्यता आहे. तेव्हा लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळल्यास कोणते उपाय करावे, ते जाणून घेऊया...