712 पालघर : कुणबी कृषी संमेलनाचं आयोजन
Continues below advertisement
पालघर जिल्हा मुंबईजवळ असला तरी याचा बहुतांश भाग आदिवासी आहे. इथला शेतकरी आजही पारंपरिक पद्धतीनं शेती करतो. या शेतकऱ्यांना आधुनिक शेतीसाठी प्रोत्साहन देण्याकरीता वाडा तालुक्यात कुणबी समाजाचं कृषी संमेलन आयोजित करण्यात आलं. २६ ते २८ जानेवारी असा तीन दिवसाचा याचा कालावधी आहे. २ एकर क्षेत्रात आधुनिक पद्धतीनं पिकांची लागवड करुन शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक दाखवण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. ३४ प्रकारच्या पिकांची लागवड या २ एकरात करण्यात आलीये. यात पॉलीहाऊस, ठिबक सिंचन पद्धती आणि आधुनीक यंत्रांच्या वापराबाबतही मार्गदर्शन देण्यात येणारेय.
Continues below advertisement