712 : खरीप पेरणीसाठी 370 वाणांनाच परवानगी

Continues below advertisement
देशभरात शेतकऱ्यांची खरीपाची लगबग सुरुये. बियाणे खरेदीलाही प्रारंभ झाला आहे. मात्र यात राज्य सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. सरकारच्या जेनेटीक इंजिनिअरींग अप्रायजल कमिटी बियाण्यांच्या सुरक्षितेची काळजी घेते. यंदा या कमिटीने राज्यात खरीपासाठी ३७० वाणांनाच विक्रीची परवानगी दिलीये. निवडक ४२ कंपन्यांनाच बियाण्यांची विक्री करता येणारेय. यात कापसाच्या बियाण्यांवर प्रामुख्याने भर दिला आहे. गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी कमी आणि मध्यम कालावधीच्या बियाण्यांची शिफारस करण्यात आलीये. म्हणजेच १८० दिवसाच्या वाणांचाच वापर करण्याची शिफारस आहे. सोबतच जीईएसीने मंजूर केलेल्या नावानेच बियाण्यांची विक्री करावी लागणारेय. मूळ उत्पादकाच्या वाणाची को-मार्केटिंगमध्ये इतर कंपन्यांना विक्री करायची असेल, तर मूळ उत्पादकाच्या पॅकिंग आणि लेबलप्रमाणे विक्री करण्याचे आदेश देण्यात आलेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram