712 | साखर निर्यातीला 3 महिन्यांची मुदतवाढ, 20 लाख टन साखर निर्यातीचं उद्दिष्ठ
साखरेच्या निर्यातीचा किमान कोटा मे महिन्य़ात सरकारनं ठरवला होता. २० लाख टन साखरेच्या निर्यातीचं उद्दिष्ठ यात ठेवण्यात आलं होतं. आता यात ३१ डिसेंबरपर्यंतची मुदतवाढ देण्यात आलीये. ३१ डिसेंबरपर्यंत देशभरातून २० लाख टन साखरेची निर्यात करण्याचं उद्दिष्ठ ठेवण्यात आलंय. आतापर्यंत यापैकी फक्त २५ टक्केच साखरेची निर्यात झालीये. गेल्या हंगामात देशात झालेल्या विक्रमी साखऱ उत्पादनामुळे सरकारनं निर्यातीचे आदेश दिले होते.