712 | आगामी वर्ष कुक्कुटपालन दिन म्हणून घोषित करणार : महादेव जानकर
आगामी वर्ष ‘कुक्कूटपालन वर्ष’ साजरे करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असं पशुसंवर्धन आणि दुगधव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी सांगीतलं. शेतीला व्यावसायिक रुप देण्यासाठी कुक्कुटपालनासारख्या व्यवसायांना पाठबळ देण्याची गरज असल्याचं ते यावेळी म्हणाले. दुग्ध व्यवसाया सोबतच कुक्कुटपालनातून चांगलं उत्पन्न मिळवता येऊ शकतं. याबाबत शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी आगामी वर्ष कुक्कुटपालन वर्ष म्हणून जाहीर करणार असल्याचं ते म्हणाले. जागतिक अंडीदिनानिमित्त पुण्यात आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार साबळे, पशुसंवर्धन आयुक्त कांतीलाल उमापयां चीही उपस्थिती होती.