712 : साखरेच्या आयातशुल्कात दुप्पटीने वाढ

Continues below advertisement
साखर उद्योगासाठी महत्त्वाचा निर्णय काल केंद्र सरकारनं घेतला. साखरेवरील आयातशुल्कात दुपटीने वाढ करण्यात आलीये. या आधी ५० टक्के असलेलं आयातशुल्क आता १०० टक्के करण्यात आलं. ठोक बाजारातील साखरेच्या दर घसरणीवर केंद्र सरकारनं हा निर्णय घेतला. यामध्ये प्रामुख्यानं पाकिस्तानातून आयात होणाऱ्या स्वस्त साखरेवर आता मर्यादा येणारेत. या निर्णयामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वेळेवर पैसे मिळणं शक्य होणारेय. साखर दरवाढीच्या मुद्द्यावरुन १९ जानेवारीला नॅशनल शुगर फेडरेशनचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी या बाबत भाष्य केलं होतं. यामध्ये साखरेवरील आयातशुल्काच्या वाढीची मागणी त्यांनी केली होती.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram