712 : शेती जगत : राज्य सरकारचा दुसरा सुधारित अंदाज जाहीर
Continues below advertisement
राज्य सरकारनं नुकतंच पीक उत्पादनाचा दुसरा सुधारीत अंदाज जाहीर केला आहे. यामध्ये पावसाचा खंड पडल्यानं पीक उत्पादनात घट होईल, असं सांगण्यात आलं. यामध्ये कापूस आणि तुरीच्या उत्पादनात मोठी घट होणार असल्याचं म्हटलं गेलं आहे. यामध्ये बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे कापसाच्या उत्पादनात ४३ टक्क्यांची घट होईल. तर कमी पावसामुळे तुरीच्या उत्पादनात ५२ टक्के घट होणार असल्याचा अंदाज आहे. महाराष्ट्र कापूस आणि तूर उत्पादनात अग्रेसर राज्य आहे. मात्र यंदा या दोन्ही पिकांचं उत्पादन घटणार असल्याचं म्हटलं जात आहे.
Continues below advertisement