712: नाशिक : गोपालनातून 70 एकर शेती समृद्ध, पाटील बंधूंचा यशस्वी दुग्ध व्यवसाय
Continues below advertisement
दुग्धोत्पादन हा शेती पूरक व्यवसायांमध्ये प्रामुख्यानं केला जातो. मात्र हा व्यवसाय करतांना जास्त उत्पादनासाठी संकरित जातीच्या गायींना प्राधान्य दिलं जातं. नाशिकच्या पाटील बंधूनी हा विचार खोडून काढला आहे. जवळपास 100 देशी गायींचं पालन करुन त्यांनी लाखोंचा नफा कमावला आहे. तसेच शेणखताचा वापर करत 70 एकर शेतीही विषमुक्त केली आहे.
Continues below advertisement