712 : नाशिक : द्राक्ष उत्पादनात यंदा घट होण्याची शक्यता
राज्यातील द्राक्ष उत्पादनात यंदा ३० ते ३५ टक्क्यांनी घट होण्याचा अंदाज आहे. चांगल्या दर्जाच्या मालाला वाढती मागणी राहील, असं सांगण्यात येत आहे. अवकाळी पाऊस, थंडी, वातावरणातील बदल यांचा द्राक्ष उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. नाशिक भागातील ८० टक्के बागांची काढणी पूर्ण झाली आहे. या द्राक्षांना दिल्ली मार्केटमध्ये ५० ते ७० रुपये प्रति किलोचा दर तर निर्यातक्षम द्राक्षांना ७५ रुपये प्रति किलोचा दर मिळतो आहे.