712 नाशिक: द्राक्ष, कांद्यानंतर आता डाळिंब निर्यातीमध्येही नाशिक आघाडीवर
द्राक्ष आणि कांद्यासाठी देशातील सगळ्याच बाजारासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा म्हणजे नाशिक. वाईन इंटस्ट्रीसाठीही हा जिल्हा प्रसिद्ध आहे. कांदा आणि द्राक्षांची सगळ्यात मोठी निर्यात याच जिल्ह्यातून केली जाते. आता यात आणखी एक नाव जोडलं गेलंय. नाशिक जिल्हा आता डाळिंब निर्यातीसाठीही प्रसिद्ध होतोय.