712 : नंदुरबार : शेतकऱ्यांना मार्गदर्शनासाठी कृषी प्रदर्शनाचं आयोजन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
28 Mar 2018 08:36 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
शेतकऱ्यांना शेतीतील नव्या तंत्रज्ञानाची माहिती देण्यासाठी आणि सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी नंदूरबारमध्ये कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. २८ मार्च पर्यंत हा कृषी महोत्सव सुरु असणारेय. या ५ दिवसीय कृषी प्रदर्शनात धान्य महोत्सव, ग्राहक-विक्रेता संमेलन, खाद्य महोत्सव, परिसंवाद आणि चर्चासत्रांचं ही आयोजन करण्यात आलंय. नंदूरबार सारख्या आदिवासी बहूल जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी हे कृषी प्रदर्शन पर्वणी ठरतंय. नवनवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून त्यांना सक्षम करण्याचं उद्धीष्ठ या प्रदर्शनामागे आहे, असं मत रोजगार आणि पर्यटन मंत्री जयकुमार रावल य़ांनी व्यक्त केलंय.