712 : नंदुरबारमध्ये पाचव्या तांदूळ महोत्सवाचं आयोजन
Continues below advertisement
नंदुरबारमध्ये नुकताच दोन दिवसीय तांदूळ महोत्सव पार पडला. या महोत्सवाचं हे पाचवं वर्ष होतं. यात वेगवेगळ्या जातीच्या तांदळांचं प्रदर्शन आणि विक्री ठेवण्यात आली होती. शेतकरी ते ग्राहक अशी थेट विक्री होण्यासाठी या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. ६ आणि ७ जानेवरीला हा महोत्सव पार पडला. यात इंद्रायणी, खुशबु, फुले सुगंधि,कामोद, चिमनसाळ, भोवड्या, कालीमुच अशा तांदळाच्या वेगवेगळ्या जाती बघायला मिळाल्या. चांगल्या दर्जाचा तांदूळ थेट शेतकऱ्याकडून विकत घेता येत असल्यानं ग्राहकांनीही इथे मोठी गर्दी केली होती. या प्रदर्शनात तांदळा सोबतच आदिवासींनी तयार केलेले काही पदार्थ आणि वस्तूही ठेवण्यात आल्या होत्या. सोबतच शेतकरी कृषक मंडळ आणि बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूही इथे विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या.
Continues below advertisement