712 नागपूर: बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळणार
बोंडअळीने झालेल्या नुकसानीचा मुद्दा हिवाळी अधिवेशनात गाजतोय. या बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना सरकारकडून मदत मिळेल तसंच विम्याचीही रक्कम देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मात्र ज्यांचा विमा नाहीये त्या शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं. राज्यात बोंडअळीनं कापूस उत्पादकांचं अंदाजे १५ हजार कोटींचं नुकसान झालंय. मुख्यमंत्र्यांच्य घोषणेमुळे या शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळेल अशी आशा आहे.