712 : नागपूर : शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि बोंडअळीच्या प्रश्नांवरुन विधान सभेत गदारोळ
बुधवारी राज्यातील हिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस होता. दोन दिवस कामकाज तहकूब झाल्यानंतर, बुधवारी काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि बोंडअळीच्या प्रश्नांवरुन विधान सभेत गदारोळही झाला. यावर विरोधी पक्ष नेते पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अजित पवार यांनी सरकारच्या धोरणावर टीका केली.