712 मुंबई: कर्जमाफीसाठी ऑनलाईन नोंदणी 15 जूनपर्यंत वाढवली
Continues below advertisement
गेल्या वर्षी जाहीर केलेल्या कर्जमाफीची ऑनलाईन नोंदणीची प्रक्रिया अजुनही पूर्ण झालेली नाही. राज्यातील कित्येक शेतकऱ्यांनी अजुनही कर्जमाफीसाठी नोंदणी केलेली नाही. म्हणूनच राज्य सरकारने ऑनलाईन नोंदणीची मुदत वाढवलीये. १५ जूनपर्यंत शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करता येणारेय. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेमध्ये १ एप्रिल २००१ ते ३१ मार्च २००९ या दरम्यान थकबाकी असणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली. या व्यतिरीक्त वन टाईम सेटलमेंट या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी या आधीचं ३१ जूनची मुदत देण्यात आलीये.
Continues below advertisement