712 | मान्सून अपडेट
काल मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरादर पावसाची नोंद झाली. कोकणातही तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या. या सॅटेलाईट इमेजमध्ये ढगांची स्थिती पाहता, येत्या काही तासांचा अंदाजही आपल्याला बांधता येईल. संपूर्ण राज्यावर ढगांची काहीशी दाटी झालेली दिसून येतेय. येत्या २४ तासात विदर्भ-मराठवाड्य़ात काही ठिकाणी पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिलाय.