712 : मान्सून अपडेट : कोकण-गोव्यात मुसळधार पावसाचा इशारा
Continues below advertisement
मान्सूनचं राज्यात आगमन झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. या नकाशामधली हिरवी रेषा मान्सून पोहचलेलं ठिकाण दाखवते. त्यानुसार मान्सून दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा-विदर्भातील काही भागात दाखल झाला आहे. येत्या 24 तासात मान्सून मुंबईसह महाराष्ट्राच्या आणखी काही भागात पुढे जाण्यास हवामान अनुकूल आहे. या काळात कोकण-गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाजही व्यक्त केला आहे.
Continues below advertisement