712 | मान्सून अपडेट
गेल्या काही दिवसांपासून राज्यावर असलेली ढगांची दाटी काहीशी विरळ झालेली बघायला मिळतेय. उत्तरेकडे हे ढग प्रवास करत असल्याचं दिसून येतंय. गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरु असलेलं पावसाचं थैमान आता ओसरलेलं दिसतंय. कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पावासमुळे पूर स्थिती निर्माण झाली होती. तिथे आता पावसाची उघडीप दिसू लागलीये. तरीही येत्या २४ तासात मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज आहे. तर कोकणात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं वर्तवलाय.