712 : मान्सून अपडेट : येत्या 24 तासात कोकण-गोव्यात जोरदार पावसाचा इशारा

Continues below advertisement
हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या काही तासात राज्यात मान्सूनचं आगमन होईल. ६ जूनला  कोकणात मान्सूनचं आगमन होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. राज्यात बऱ्याच भागामध्ये पूर्व मान्सून पावसाच्या सरी बरसत आहेत. येत्या २४ तासात कोकण-गोव्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram