712 नवी दिल्ली: कोणत्या पिकाला किती हमीभाव?
केंद्र सरकारनं यंदाच्या खरीप पिकांच्या हमीभावांची घोषणा केली. उत्पादन खर्चापेक्षा ५० टक्क्यांपर्यंत जास्त हमीभाव यंदा सरकारनं दिलाय. यात भाताच्या दरात २०० रुपयांची वाढ करण्यात आलीये. यामध्ये खरीपातील १४ प्रमुख पिकांच्या हमीभावात वाढ करण्यात आलीये. हमीभावाची घोषणा तर झाली, मात्र त्याची अंमलबजावणी होईल का हा अजुनही प्रश्नच आहे. कोणत्या पिकाला कसा दर मिळालाय ते आता पाहूया.