712 : खासगी दूध संघाकडून दुधाच्या खरेदीदरात कपात
खाजगी दूध संघाच्या बैठकीमध्ये दूध दरात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. सरकारनं या आधी 27 रुपये प्रती लिटर हा दर निश्चीत केला होता. मात्र यात खाजगी दूध संघानं 4 रुपयांची कपात केलीये. 23 रुपये प्रती लिटर या दरानं आता ते दुधाची खरेदी करणारेत. त्यांच्या या निर्णयामध्ये आतापर्यंत सरकारनं कुठलाही हस्तक्षेप केला नाहीये. राज्यात सुमारे 35 ते 40 लाख लिटर दुधाचं संकलन खाजगी दूध संघ करतात. तर सुमारे 12 ते 15 लाख लिटर दुधाची खरेदी सहकारी संघाद्वारे केली जाते. या दर कपातीचा थेट परिणाम दूध उत्पादक शेतकऱ्यांवर होणार आहे.