712 | दूध उत्पादक संस्थांचे थकलेले अनुदान देण्याची मागणी
राज्यात सध्या दूध दराचा प्रश्न गंभीर होतोय. सरकारनं नुकत्याच केलेल्या दरकपातीमुळे दूधसंघ आणि शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जातेय. अशातच खाजगी आणि सहकारी दूध संस्थांची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीमध्ये राज्य सरकारने दूध संस्थांचं थकित अनुदान लवकरात लवकर देण्याची मागणी करण्यात आली. असं झालं नाही तर शेतकऱ्यांना २५ रुपये प्रति लिटरचा दर देणं अवघड होईल, असा निर्णय घेण्यात आला. मागील ५० दिवसांचे मिळून जवळपास १८० कोटी रुपयांचं अनुदान सरकारनं थकवल्याची माहिती मिळतेय. ६ ऑक्टोबरपर्यंत अनुदान न दिल्यास ११ ऑक्टोबरपासून २५ रुपये दराने दूध खरेदी बंद करु, असा इशारा दूध संस्थांनी दिलाय.