712 : रत्नागिरी : देवगडच्या हापूस आंब्याची आवक घटल्याने दर वधारले

Continues below advertisement
देवगडचा हापूस आंबा जगभरात प्रसिद्ध आहे. उन्हाळा सुरु झाला की प्रत्येक जण या आंब्याची आतुरतेने वाट पाहतो. मात्र यंदा या हापूस आंब्याची आवक घटण्याची शक्यता आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे हापूस आंब्याचं उत्पादन घटलं आहे. साधारणपणे होळीनंतर बाजारामध्ये आंब्याची नियमित आवक सुरु होते. मात्र यंदा यात ५० टक्क्यांनी घट झाल्याचं दिसून आलं आहे. आवक कमी झाल्याने आंब्याचे दरही वधारले आहेत. एक ते दीड हजार रुपये प्रति डझन या दराने आंब्याची विक्री केली जात आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram