मध्य प्रदेश सरकारकडून शेतकऱ्यांना पेन्शन | 712 | एबीपी माझा
सत्तेत आल्यानंतर लगेच मध्यप्रदेशातील कमलनाथ सरकारनं शेतकरी हिताचे निर्णय घेणं सुरु केलंय. आधी कर्जमाफी आणि आता शेतकऱ्यांसाठी पेन्शनची योजनाही सुरु करण्यात आलीये. या योजनेअंतर्गत ६० वर्ष वयावरील शेतकऱ्यांना पेन्शन देण्यात येणारेय. दरमहा १ हजार रुपये या योजनेत दिले जाणारेत. मध्य प्रदेश राज्यातील १० लाख शेतकऱ्यांना याचा लाभ घेता येणारेय. या योजनेसाठी दरवर्षी १२०० कोटी रुपये निधी दिला जाणारेय. याची घोषणा नुकतीच मध्य प्रदेश सरकारनं केली.