712 माढा, पंढरपूर: ऊस पट्ट्यातील भात शेतीचा यशस्वी प्रयोग
सोलापूर जिल्हा साखर कारखानदारीसाठी प्रसिद्ध. एकिकडे दुष्काळ दुसरीकडे ऊसाला दिलं जाणारं पाटपाणी यामुळे इथला शेतकरी बऱ्याचदा टिकेचा धनी ठरत आलाय. मात्र काही शेतकरी यावर उपाय शोधत असतात. माढा तालुक्यातल्या सुलतानपूरचे दिनकर साळुंखे अशा शेतकऱ्यांपैकीच एक. त्यांनी ऊसपट्ट्यात भातशेतीचा प्रयोग केला. कसलाही पूर्वानुभव नसताना केलेल्या या भातशेतीतून त्यांना लाखोंचं उत्पन्न मिळणार आहे.