712 कोल्हापूर : बाजारातील गुळावर 70 टक्के बिनव्याजी उचल देण्याचा निर्णय
Continues below advertisement
कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या महिन्यापासून सातत्यानं गुळाच्या दरात घसरण होतेय. गेल्या महिन्यात ३६०० ते ४००० रुपये प्रति क्विंटल असणारा गुळ, आता २६०० ते ३००० रुपये क्विंटल दरानं विकला जातोय. याबाबत शनिवारी पुणे इथे पणन मंडळाच्या कार्यालयात बैठक झाली. यावेळी पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत, पणनचे अधिकारी , कोल्हापूर, पुणे , सांगली , सातारा जिल्ह्यातील बाजार समित्यांचे सचिव उपस्थित होते.ज्या शेतकऱ्यांना सध्या गूळ विकायचा नाही त्यांचा गुळ दोन ते अडीच महिने गोदामात ठेवून घेण्यात यावा. आणि बाजार समितीने शेतकऱ्याला सध्याच्या दरानं गुळावर ७० टक्के बिनव्याजी उचल द्यावी असा निर्णय घेण्यात आला.
Continues below advertisement