712 कोल्हापूर : जीआय मानांकनानुसार गूळ उत्पादनासाठी कार्यशाळेचं आयोजन
Continues below advertisement
कोल्हापूरी गुळाला जी.आय मानांकन मिळून आता 4 वर्ष होत आलेत. मात्र इथले गूळ उत्पादक शेतकरी अजूनही त्या दर्जाचा गूळ तयार करत नाही. याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन देण्यासाठी कोल्हापूरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. यासाठी जी.आय मानांकन तज्ञ गणेश हिंगमिरे यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. कोल्हापूरी गुळाला मागणी असली, तरी दर्जा अभावी बरीच गुऱ्हाळघरं बंद होण्याच्या मार्गावर आहे. अशा वेळी ही कार्यशाळा मार्गदर्शक ठरते. कृषी उत्पन्न बाजार समितीकडूनही गुळाचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयोगशाळा उभारण्यात य़ेणार आहेत. याबाबतची माहिती बाजार समितीचे उपसभापती अमित कांबळे यांनी दिली.
Continues below advertisement