712 खरीप पेरणीला सुरुवात, आतापर्यंत ६५ लाख ५ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी
Continues below advertisement
देशभरात खरीप पेरणीला सुरुवात झालीये. मान्सूनही आता काही तासांच्या अंतरावर आहे. देशात आतापर्यंत ६५ लाख ५ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालीये. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही आकडेवारी काहीशी कमी आहे. गेल्या वर्षी याच काळात देशात ६९ लाख ८ हजार हेक्टरवर खरीपाची पेरणी झाली होती, अशी माहिती कृषी विभागानं दिली आहे. यंदा १ लाख ५२ हजार हेक्टर क्षेत्रावर भाताची लागव़ड झालीये. गेल्या वर्षी ही लागवड २ लाख १७ हजार हेक्टरवर झाली होती. यंदा डाळींच्या लागव़ड क्षेत्रात मात्र घट झालीये. गेल्या वर्षी १ लाख १५ हजार हेक्टरवर डाळींची लागवड करण्यात आली होती. ती यंदा ६१ हजार हेक्टरवर आलीये.
Continues below advertisement