712 मुंबई: काबुली हरभऱ्याचं आयात शुल्क 60 टक्क्यांवर
Continues below advertisement
बाजारात हरभऱ्याचा दर दिवसेंदिवस घसरतोय. तो सावरण्यासाठी सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतलाय. काबुली हरभऱ्यावरील आयातशुल्कात वाढ करण्यात आलीये. या आधी ४० टक्के असणारं आयातशुल्क आता ६० टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आलंय. विदेशातून मोठ्या प्रमाणात काबुली हरभऱ्याची आवक होते. यामुळे देशांतर्गत बाजारात हरभऱ्याचा दर हमीभावाच्याही खाली आला. त्यातही पाऊस चांगला झाल्यानं यंदा हरभऱ्याचं उत्पादन अधिक होण्याचा कृषी खात्याचा अंदाज आहे. त्यामुळे हा निर्णय महत्त्वाचा ठरतोय.
Continues below advertisement