712 जळगाव: जामनेर - कापूस वेचणीला मजुर मिळेनात, शेतकऱ्याने चक्क दवंडी पिटली
Continues below advertisement
ऐन कापूस वेचणीच्या काळात मजुर मिळत नसल्यानं जळगाव जिल्ह्य़ातील शेतकरी हतबल झालाय. जिल्ह्यातील सर्वाधिक क्षेत्रावर कापूस पिकाची लागवड केली जाते. आता हा कापूस वेचणीच्या अवस्थेत आहे. मात्र मजुर न मिळाल्यानं ती खोळंबली. यावर गोपाळ गोरे या शेतकऱ्यानं एक आयडिया शोधुन काढली. गावोगावी जाऊन स्वतः दवंडी देत या शेतकऱ्यानं मजुरांना आवाहन केलं. नेहमीपेक्षा अधिक दर देण्याचंही कबूल केलं. या शेतकऱ्याच्या या दवंडीची चर्चा सध्या गावागावात सुरु आहे.
Continues below advertisement