712 शेती जगत : जालना बाजार समितीत मोसंबीची आवक घटली
Continues below advertisement
जालना कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये सध्या मृग बहार आणि हस्त बहराची मोसंबी विक्रीसाठी आणली जातेय. मात्र गेल्या महिन्यात झालेली गारपीट आणि अवकाळी पावसाचा मोसंबी बागांना फटका बसला. त्यामुळेच यंदा बाजारात मोसंबीची आवक घटलीये. जिथे टनाने उत्पन्न हाती पडायचं तिथे काही क्विंटलच उत्पन्न हाती आलंय. दररोज 20 ते 30 टनांची आवक मार्केट मध्ये होतेय. गेल्या वर्षी च्या तुलनेत ही आवक 70 टक्यांनी घटलीय. मोसंबीच्या दराने 33 हजार रुपये प्रतीटनांपर्यंत उसळी घेतलीये. उत्पन्न कमी जरी झालं असेल तरी भाव मागच्या वर्षीच्या तुलनेत कत्येक पटीने जास्त असल्याने काही शेतकरी समाधानी आहेत.
Continues below advertisement