712 | जळगाव | युरियाच्या अतिरिक्त वापराने पिकांची वाढ खुंटण्याची शक्यता
दर्जेदार उत्पादनासाठी कीड नियंत्रणासोबतच खत व्यवस्थापनही गरजेचं आहे. सध्या राज्यातील खरिप पिकं वाढीच्या अवस्थेत आहेत. अशा वेळी योग्य प्रमाणात खत देणं गरजेचं असतं. इतर खतांच्या तुलनेत युरियाचा दर कमी असल्यानं शेतकरी त्याची जास्त खरेदी करतायत. याच गोष्टीचा फायदा घेत काही विक्रेते युरियाची जादा दरात विक्री करत असल्याची माहिती मिळतेय.