कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सहकार मेळाव्याचं आयोजन | 712 | जळगाव | एबीपी माझा
शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवायचं असेल तर फक्त शेतमालाच्या उत्पादनावर भर देऊन भागणार नाही. तर प्रक्रिया उद्योगांनाही प्रोत्साहन मिळणं गरजेचं आहे. त्यासाठी बाजार समिती आणि सहकारी संस्था यांनी सक्षम होणं आवश्यक आहे. यासाठी जळगावमध्ये नुकताच सहकार मेळावा आयोजित करण्यात आला होता.