712 जळगाव: राष्ट्रीय केळी परिषदेचं आयोजन
देशात जळगाव जिल्हा केळी उत्पादनात अग्रेसर समजला जातो. मात्र या जिल्ह्यातून निर्यातक्षम केळींचं उत्पादन फार कमी बघायला मिळतं. अशा उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठीच राष्ट्रीय केळी संशोधन केंद्र आणि ऍग्रोसर्च इंडिया लिमिटेड यांनी एकत्रितपणे राष्ट्रीय केळी परिषदेचं आयोजन करण्यात आलं. या परिषदेत देशभरातील शेतकरी आणि केळी संशोधकांनी हजेरी लावली. या परिषदेची सुरुवात राष्ट्रीय केळी संशोधन केंद्राच्या प्रमुख एस. उमा यांच्या हस्ते करण्यात आली. यात शेतकऱ्यांना केळीचं निर्यातक्षम उत्पादन घेण्यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायले हवी, याबाबत मार्गदर्शन दिलं.