712 पुणे : इंदापूरमध्ये लाळ्या खुरकूतमुळे 4 गायींच्या मृत्यूचा संशय, तज्ज्ञांची पाहणी
Continues below advertisement
लाळ्या खुरकुत या रोगाच्या लसीकरणाचा मुद्दा गंभीर होत चाललाय. वर्षभरात एकही लसीकरण न झाल्यानं जनावरांना या रोगाची लागण होण्याची भिती होती. इंदापूरमध्ये ती खरी होताना दिसतेय. वरकुटे बुद्रुक या गावातील दिपक आणि अशोक शिंदे यांच्या ४ गायींचा नुकताच मृत्यू झाला. लाळ्या खुरकुताची लागण होऊन त्यांचा मृत्यू झाल्याचं ते म्हणतायत. आणखी १६ गायींमध्येही अशीच लक्षणं दिसतायत. त्यांच्या तपासणीसाठी विभागीय रोग अन्वेषण विभागाचे तज्ञ आणि पशुवैद्य आले होते. तेव्हा हा लाळ्या खुरकुतच आहे असं खात्रीशीर सांगता येत नसल्याचं ते म्हणाले.
Continues below advertisement