712 : अमेरिकेतील हरभरा, तुरीच्या आयात शुल्कात वाढ
Continues below advertisement
अमेरीकेने यावर्षी ९ मार्चला भारतातून आय़ात होणाऱ्या काही वस्तुंवरील आयातशुल्क वाढवलं होतं. आता भारतानेही असाच निर्णय घेतला आहे. भारताने अमेरीकेतून आयात होणाऱ्या काही वस्तुंवरील आयात शुल्क वाढवलं आहे. यात हरभरा आणि तुरीच्या आयात शुल्कात प्रामुख्यानं वाढ झाली. काबुली आणि देशी हरभऱ्याचं आयातशुल्क ६० टक्क्यांवर करण्यात आलं आहे. तर तुरीच्या आयातशुल्कात ४० टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. ४ ऑगस्टपासून ही आयातशुल्कातील वाढ लागू करण्यात येणार आहे.
Continues below advertisement