पीक विमा तक्रार निवारण समिती स्थापनेची मागणी | 712 | धुळे | एबीपी माझा
बोंडअळी सारखी समस्या असो किंवा एखादं नैसर्गीक संकट. या सगळ्यांपासून पिकाला आर्थिक आधार देण्यासाठीची योजना म्हणजे पीक विमा. मात्र या योजनेची अंमलबजावणी नीट होताना दिसत नाही. शेतकऱ्यांना त्यांची तक्रार मांडायलाही जागा नाही. अशा वेळी जिल्हा स्तरावर शेतकऱ्यांसाठी तक्रार निवारण केंद्र सुरु करण्याची मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आलीये.