712 मुंबई: 'पात्र शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी बँकेशी संपर्क साधावा'
सरकारनं कर्जमाफी जाहीर केली आणि त्याची सगळी प्रक्रियाही ऑनलाईन केली. मात्र यामध्ये बरेच घोळ समोर आले. कर्जमाफी जाहीर करुन महिने झाल्यानंतरही कित्येक पात्र शेतकरी लाभापासून वंचित राहीले. अशा शेतकऱ्यांनी आता लाभासाठी बँकेशी संपर्क साधावा असं आवाहन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केलंय. अर्जदार पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी सरकारनं तालुकास्तरिय समिती गठीत केलीये. या समित्यांद्वारे पात्र शेतकऱ्यांच्या नावाच्या याद्या बँकांकडे पाठवण्यात आल्यात. तेव्हा कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी कर्ज खात्याच्या माहितीसह बँकेत जावं असं आवाहन करण्यात येतंय.