712 : एकात्मिक फलोत्पादन योजनेमध्ये ऑनलाईन अर्जासाठई मुदतवाढ
Continues below advertisement
मान्सून सक्रिय झाल्यानंतर शेतकऱ्यांचा पेरणीचा मार्गही मोकळा होणार आहे. यंदा हंगामी पिकांसोबतच फळपिकांची लागवड वाढवण्यासाठी राज्यात एकात्मिक फलोत्पादन अभियान राबवलं जात आहे. या हॉर्टीनेट संगणक प्रणालीमध्ये ऑनलाईन अर्ज करण्याची २० जूनपर्यंत मुदत होती. ती आता ३० जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे. आतापर्यंत या अभियानात १ लाख ६१ हजार शेतकऱ्यांचे अर्ज दाखल झाले आहेत. आणखी बऱ्याच शेतकऱ्यांचे अर्ज येणं बाकी असल्यामुळे, ही मुदतवाढ देण्यात आली आहे.
Continues below advertisement