712 शेती जगत: देशातील अंडी उत्पादनात वाढ
Continues below advertisement
देशातील अंडी उत्पादनात २०१६-१७ मध्ये वाढ झालेली दिसून आलीये. केंद्रीय कृषी मंत्रालयानं नुकतीच याबाबतची माहिती जाहिर केली. २०१६-१७ या वर्षात देशात ८८ अब्जापर्यंत अंडी उत्पादन झालं. २०१३-१४ तुलनेत १२ टक्क्यांची ही वाढ आहे. २०१७-१८ च्या उन्हाळ्यातही देशात मोठ्या प्रमाणात अंडी उत्पादन झालं. अंड्यांचा वृद्धीदरही वाढता आहे. अंडी उत्पादनात अग्रेसर असलेल्या राज्यांमध्ये तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, पश्चिम बंगाल आणि हरियाणाचा समावेश आहे. देशात पोल्ट्रीद्वारे होणाऱ्य़ा अंडी उत्पादनाचं प्रमाण ८० टक्के असल्याचं कृषी मंत्रालयाचा अहवालात म्हटलं गेलंय.
Continues below advertisement